अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन; शेतकरी कर्जमाफीच्या मागण्यांसाठी रोहित पवार आक्रमक:-
जि.रायगड, ता.कर्जत:दि. 12 जून :-शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड येथे “अन्नदात्यासाठी अन्नत्याग” आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि कर्जबाजारीपणातून दिलासा मिळावा यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.
आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्यात यावी.
२०१९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करून सर्व शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी.
दोन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना आधी अतिरिक्त रक्कम भरण्याची अट न घालता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ द्यावा.
प्रोत्साहनपर अनुदानासाठी ठेवलेली सलग दोन वर्षे नियमित कर्जफेड करण्याची अट रद्द करण्यात यावी.
२०१७ च्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र असूनही कागदपत्रांच्या त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या ६.५६ लाख शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा.
या सर्व मागण्या सरकारने तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
दरम्यान, या आंदोलनाला अभिजीत पाटील आणि राजू खरे यांनी पाठिंबा दर्शविला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकरी हिताच्या या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.




