नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा


नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा

ठाणे : नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करणारे पती-पत्नी आर.सी. पाटील पुलावरून जात असताना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिच्या पतींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जात असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा घटनास्थळावरून जात होता. अपघात पाहताच त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला आणि परिस्थितीची माहिती घेतली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जखमी व्यक्तीला त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. तसेच रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवांची व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548129


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!