पुण्यात धक्कादायक घटना; लग्नाला नकार दिल्याच्या रागातून ३ वर्षांच्या चिमुरड्याचा खून


पुण्यात धक्कादायक घटना; लग्नाला नकार दिल्याच्या रागातून ३ वर्षांच्या चिमुरड्याचा खून

पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीच्या अवघ्या तीन वर्षांच्या मुलाची मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवांशू साहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कारेगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, संबंधित महिलेने लग्नास नकार दिल्याने आरोपी तिच्यावर नाराज होता.

याच रागातून आरोपीने महिलेचा तीन वर्षांचा मुलगा अंशु कोल याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने चिमुरड्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच. राजणगाव येथील पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून नेमकी घटना कशी घडली, तसेच त्यामागील सर्व परिस्थितीचा सखोल तपास सुरू आहे. निष्पाप बालकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असून परिसरात शोककळा पसरली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!