​माहिती अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक; ५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा



​माहिती अधिकाराच्या नव्या नियमांविरोधात अण्णा हजारे आक्रमक; ५ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा

​राळेगणसिद्धी सरकारच्या माहिती अधिकारविषयक (RTI) नव्या नियमांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने लागू केलेले हे नवे नियम माहितीचा अधिकार कमकुवत करणारे आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहेत, असा थेट आरोप अण्णा हजारे यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात अण्णा हजारे यांनी, हे नवीन नियम तातडीने रद्द करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी केली आहे. सरकारने या नियमांवर तातडीने मागे पाऊल न घेतल्यास, येत्या ५ जुलैपासून आपल्या मूळ गावी म्हणजेच राळेगणसिद्धी येथे बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने माहिती अधिकाराच्या नियमावलीत काही बदल सुचवले आहेत, ज्यावर अण्णा हजारे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे नियम पारदर्शकता संपवणारे असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा येईल, असे अण्णांचे म्हणणे आहे. आता या इशाऱ्यावर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि ५ जुलैपूर्वी यावर काही तोडगा निघतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!