चौकशीच्या भीतीपोटी कागदी मिश्र रोपवनात वन प्रशासनाकडून नव्याने रोपे लावण्याचा प्रयत्न सुरू:-
जि. वाशिम, ता. मनोरा: दी.3 जुलै :-मानोरा :* गिरोली वन वर्तुळातील सावरगांव कान्होबा वन बीट मधील कक्ष क्र. १३८ मधील ३० हेक्टर मिश्र रोपवनात २०२१-०२२ मध्ये शासनाने लाखो रुपये खर्च मंजूर केलेल्या मात्र प्रशासनाने हे लक्षावधी रुपये कागदावर खर्च करून लावलेली एकही रोपे जगवली नसल्याचा कागदी रोपवन घोटाळा उघडकीस आल्याने संभाव्य कारवाईच्या भीतीने वन विभागाने आता घाईघाईने पुन्हा रोप लागवड सुरू केली आहे, असा खळबळजनक आरोप खापरदरी येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश शामराव राठोड यांनी केला आहे.
याबाबत राठोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांचेसह वरिष्ठांना लेखी निवेदन दिले आहे.
दि.२६ जून ०२६ रोजी पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी ते गेले असता, मंदिराच्या पाठीमागे असलेल्या कक्ष क्र.१३८ मध्ये काही मजूर रोपे घेऊन जाताना दिसले. विचारणा केली असता, “सरकारी उजाड रोपवनात रोपे लावण्यासाठी जातोय” असे मजुरांनी सांगितल्याचे राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सदर कक्षात २०२१-२२ मध्ये ‘भरीव वनीकरण’ योजनेअंतर्गत ३० हेक्टरवर मिश्र रोपवन करण्यात आले होते. यासाठी प्र.मा.क्र. ७० व ६० दि.२३.०९.०२२ नुसार मोठा निधी खर्च झाडे जगवण्यावर वन प्रशासनाकडून करण्यात आला.
मात्र ४ वर्षांनंतर प्रत्यक्ष जागेवर एकही झाड जिवंत नसल्याचे आघाडीच्या सर्व वृत्तपत्रांनी पुराव्यासह उघडकीस आणले होते.
*आता अचानक जाग कशी आली?*
“जुने रोपवन कागदावरच होते, निधी लाटला गेला. बिंग कुठल्याने आता चौकशी लागेल या भीतीने वन प्रशासनाने घाईघाईने पुन्हा रोपे लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे,” असा थेट आरोप जगदीश राठोड यांनी केला आहे. “ही रोपे जगवण्यासाठी लावली जात आहेत की, भविष्यातील चौकशीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राठोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी मानोरा यांना दिलेल्या निवेदनात ३ प्रमुख मागण्या केल्या आहेत:
१. *सध्या कक्ष क्र. १३८ मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत रोप लागवड सुरू आहे , तालुक्यातील आणखी किती वर्तुळात अशी रोप लावणी सुरू आहे ?*
२. *कक्ष क्रमांक १३८ मध्ये एकूण किती संख्येत रोपे लावली जात आहेत?*
३. *ही रोपे जगवण्यासाठी आहेत की जुना घोटाळा लपवण्यासाठी, याचा खुलासा निवेदनाद्वारे मागण्यात आला आहे.*
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.








