सांगली: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सतीश मोहिते; नूतन कार्यकारिणी बिनविरोध जाहीर


सांगली: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सतीश मोहिते; नूतन कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

सांगली:दी. 4 जुलै :-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या तयारीला वेग आला असून, अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीची नूतन कार्यकारिणी रविवारी बिनविरोध जाहीर करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी सतीश मोहिते कार्याध्यक्षपदी शेखर मोहिते आणि उपाध्यक्षपदी जितेंद्र वायदंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दलितमित्र अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्री साठे आणि नातू सचिन साठे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून कायमस्वरूपी निवड करण्यात आली.

समितीच्या सल्लागार मंडळावर कुलदीप देवकुळे, सुरेश दुधगावकर, आसीफभाई बावा, अशोक पवार, किरणराज कांबळे, शेवंताताई वाघमारे आणि संभाजी केंचे यांची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून यंदाचा अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अधिक भव्य आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पत्रकार विजय रणभोर


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!