पुण्यात २० वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; प्रियकरासह चार आरोपी अटकेत
पुणे : पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० वर्षीय तरुणीवर चौघांनी वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी मुख्य आरोपीसह चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने आपल्या तीन मित्रांनाही पीडितेकडे पाठवले. आरोपींनी तरुणीचे अश्लील व्हिडिओ चित्रीत करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले. तसेच विविध लॉज आणि फ्लॅटवर नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर वाघोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास वाघोलीपोलीस करत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






