भिवंडी-कल्याण रोडवर ट्रक चालकाची निर्घृण हत्या; राजनौली नाक्याजवळील घटनेने खळबळ


भिवंडी-कल्याण रोडवर ट्रक चालकाची निर्घृण हत्या; राजनौली नाक्याजवळील घटनेने खळबळ

भिवंडी : भिवंडी-कल्याण महामार्गावरील राजनौली नाका परिसर, टाटा आमंत्रण गेट क्रमांक २ जवळ काल रात्री एका ट्रक चालकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दल आणि गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

राजनौली नाका व टाटा आमंत्रण परिसरातील मुख्य मार्ग तसेच दुकानांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू आहे. हत्या लुटमारीच्या उद्देशाने झाली, रस्त्यावरील वादातून घडली की यामागे वैयक्तिक वैमनस्य आहे, या सर्व शक्यतांनी पोलीस तपास करत आहेत.

तसेच, काल रात्री परिसरात उपस्थित असलेले सुरक्षारक्षक आणि इतर वाहनचालकांकडे पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.

महामार्गावर घडलेल्या या घटनेमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या मालवाहू वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची विविध पथके
कार्यरत आहेत

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!