जळगाव विमानतळ ते गाडेगाव घाट रस्त्यावर चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीची नागरिकांची मागणी!..


जळगाव विमानतळ ते गाडेगाव घाट रस्त्यावर चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; एमआयडीसी पोलिसांच्या गस्तीची नागरिकांची मागणी!..

सोमेश मुळे जळगाव: जळगाव विमानतळ ते गाडेगाव घाट दरम्यानच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी पोलिसांनी या परिसरात तातडीने रात्रीची आणि दिवसाची गस्त वाढवावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्तजळगाव विमानतळ ते गाडेगाव घाट हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, या रस्त्यावरील काही भाग निर्जन आणि अंधारा असल्याने त्याचा गैरफायदा चोरटे घेत आहेत. रात्रीच्या वेळी एकट्या-दुकट्या वाहनधारकांना गाठून त्यांना लुटणे, दुचाकींची चोरी करणे आणि परिसरातील शेतातील मौल्यवान साहित्यांवर डल्ला मारण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.एमआयडीसी पोलिसांकडे गस्तीची मागणीहा संपूर्ण परिसर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. चोऱ्यांच्या सलग घटनांमुळे स्थानिक रहिवासी अत्यंत त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांनी केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करावे, अशी मागणी होत आहे.
मुख्य मागण्या :
एमआयडीसी पोलिसांनी या मार्गावर २४ तास फिरते पोलीस पथक (पेट्रोलिंग) तैनात करावे.रात्रीच्या वेळी संशयास्पद रित्या फिरणाऱ्यांची कसून चौकशी व्हावी.महामार्गावरील अंधारे पैच ओळखून तेथे प्रकाश व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.स्थानिक प्रशासनाने आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे.


46
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!