उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये गुणवंतांचा सन्मान सोहळा
पिंपरी-चिंचवड : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘उद्धवश्री पुरस्कार २०२६’ देऊन गौरव करण्यात येणार आहे.
शहरप्रमुख चेतन महादेव पवार यांच्या पुढाकाराने आयोजित या सन्मान सोहळ्यात सामाजिक, वैद्यकीय, साहित्यिक, क्रीडा, शैक्षणिक, कामगार, कला व इतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला शहरातील शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता ताथवडे, पुणे येथील सुवर्णपाणी फार्म येथे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात येणार असून, उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
विजय अडसूळ प्रतिनिधी
9623113336







