कुर्ला पूर्वेत पहाटे क्रेन कोसळली; ८ जखमी, प्रकृती स्थिर


कुर्ला पूर्वेत पहाटे क्रेन कोसळली; ८ जखमी, प्रकृती स्थिर

मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात शुक्रवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास क्रेन कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
BMCच्या सायन रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, ६ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच कुर्ला भाभा रुग्णालयात आणखी २ जखमींवर उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. दरम्यान, दुर्घटनास्थळी आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. घटनेची अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


47
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!