राष्ट्रीय हॉकीपटू व रेल्वे पोलीस PSI प्रकाश सपकाळ सेवानिवृत्त; शाल-श्रीफळ देऊन दिमाखदार सत्कार,


राष्ट्रीय हॉकीपटू व रेल्वे पोलीस PSI प्रकाश सपकाळ सेवानिवृत्त; शाल-श्रीफळ देऊन दिमाखदार सत्कार,
पोलीस सेवा आणि हॉकीच्या मैदानावर उल्लेखनीय कामगिरी; सहकाऱ्यांनी जागविल्या जुन्या आठवणी

प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
पुणे : पुणे लोहमार्ग पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून प्रदीर्घकाळ कर्तव्य बजावताना पोलीस सेवेसोबतच राष्ट्रीय स्तरावरील हॉकीपटू म्हणूनही आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा उमटविणारे प्रकाश सपकाळ शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने माननीय पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, श्री. डॉ. राजकुमार शिंदे (भापोसे) यांच्या कार्यालयात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी प्रकाश सपकाळ यांचा शाल, श्रीफळ,  व भेटवस्तू देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. पोलीस दलातील प्रदीर्घ सेवा आणि राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू म्हणून केलेली उल्लेखनीय कामगिरी यांचा गौरव करत उपस्थित अधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांच्या सेवाकार्याला उजाळा दिला.
प्रकाश सपकाळ यांनी पोलीस सेवेत कर्तव्य बजावताना शिस्त, प्रामाणिकपणा, जबाबदारी आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिले. त्याचबरोबर हॉकीच्या मैदानावरही त्यांनी आपल्या खेळाची वेगळी ओळख निर्माण केली. पोलीस दलातील जबाबदारी आणि क्रीडा क्षेत्रातील आवड यांचा सुरेख समन्वय साधत त्यांनी दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले.
सेवापूर्ती समारंभात सहकाऱ्यांनी सपकाळ यांच्या कार्यकाळातील विविध आठवणींना उजाळा दिला. सहकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध, मनमिळावू स्वभाव आणि कामाप्रती असलेली निष्ठा यांचा उपस्थितांनी आवर्जून उल्लेख केला. अनेक वर्षे एकत्र काम केलेल्या सहकाऱ्यांसाठी सपकाळ यांच्या निवृत्तीचा क्षण भावनिक ठरला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास रेल्वे पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच हॉकी क्षेत्राशी संबंधित सहकारी उपस्थित होते.
यावेळी रेल्वे पोलीस RPI श्री. टोणे सर, RSI टेंभुर्णे, मुख्यालय खडकी, तसेच हॉकीपटू PI अमर कदम, API अमोल भोसले, API संतोष पाटील, API संजय पांढरे, PSI सुनील माने, ASI रमाकांत कारले, साळुंखे, मिलिंद लोणारे, बारामतीकर, जाधव, साबळे, धिवार, पीरगणवार, रफिक शेख, फिरोज शेख, राजेश मुसळे, रोहिदास मुसळे यांच्यासह रेल्वे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस सेवा आणि क्रीडा क्षेत्राचा अनोखा संगम
प्रकाश सपकाळ यांच्या सेवापूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी शासकीय पोलीस सेवा बजावत असतानाच राष्ट्रीय पातळीवरील हॉकीमध्येही आपले योगदान दिले. पोलीस दलातील शिस्त आणि हॉकीच्या मैदानावरील संघभावना या दोन्हींचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
सेवानिवृत्ती हा सेवाकार्याचा शेवट नसून नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. पोलीस सेवा आणि क्रीडा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग भविष्यात युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच समाजासाठी करण्याची अपेक्षाही उपस्थितांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना प्रकाश सपकाळ यांनी उपस्थित अधिकारी, सहकारी, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे आभार मानले. प्रदीर्घ सेवाकाळात वरिष्ठांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि कुटुंबीयांचा पाठिंबा यामुळेच आपण आपली सेवा यशस्वीपणे पूर्ण करू शकलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय हॉकीपटू म्हणून मैदानावर गाजवलेली कामगिरी आणि रेल्वे पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ सेवा यामुळे प्रकाश सपकाळ यांच्या सेवापूर्तीचा सोहळा अधिकारी, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमींसाठी विशेष ठरला.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!