सध्याचे राजकारण पाहून मनाला वेदना; नाथाभाऊंची खंत, जुन्या राजकारणाची आठवण काढत भाजपच्या यशाचे श्रेय मांडले


सध्याचे राजकारण पाहून मनाला वेदना; नाथाभाऊंची खंत, जुन्या राजकारणाची आठवण काढत भाजपच्या यशाचे श्रेय मांडले

मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे करण्यात आले. या कार्यक्रमात खडसे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील आठवणींना उजाळा देत सध्याच्या राजकारणाच्या बदलत्या स्वरूपावर नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील राजकारण आणि आजचे राजकारण यामध्ये मोठा फरक निर्माण झाला आहे. त्या काळातील राजकारणात विचार, संघर्ष आणि कार्यकर्त्यांशी असलेले नाते महत्त्वाचे होते. मात्र, सध्याचे राजकारण पाहताना मनाला वेदना होतात, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
२००० ते २०१४ या काळात महाराष्ट्रात पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि विस्तारासाठी मोठे काम करण्यात आले. त्याच काळात घातलेल्या मजबूत पायावर पुढील काळात भाजपला मोठे राजकीय यश मिळाले, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यकाळातील राजकीय संस्कृती, संघर्षाची भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध यांचा उल्लेख करत खडसे यांनी बदलत्या राजकारणाबाबतची आपली खंत यावेळी स्पष्टपणे व्यक्त केली.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!