रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; मराठी एकीकरण समितीचा जोरदार युक्तिवाद


रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; मराठी एकीकरण समितीचा जोरदार युक्तिवाद

​प्रतिनिधी: उमेश कुलकर्णी
​मुंबई:
रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा नियमाच्या अंमलबजावणीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
​मोहम्मद कासीम अहमद यांच्या वतीने अधिवक्ता विवेक शुक्ला यांनी मराठी भाषा शिकण्याची सक्ती अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता. या युक्तिवादाला मराठी एकीकरण समितीने ठाम विरोध दर्शवला. समितीने महाराष्ट्र अधिकृत भाषा अधिनियम १९६४, मराठी भाषेचे कायदेशीर स्थान आणि महाराष्ट्रातील मराठी नागरिकांच्या भाषिक हक्कांचा मुद्दा न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडला.
​दरम्यान, शासनाने मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलेल्या एका वर्षाच्या मुदतवाढीलाही मराठी एकीकरण समितीचा तीव्र विरोध आहे. या मुदतीबाबत येत्या आठवड्यात योग्य युक्तिवादासह आपली अधिकृत भूमिका न्यायालयासमोर मांडणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!