श्रीरामपूर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध.


श्रीरामपूर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

 

टाकळीभान प्रतिनिधी- २२० श्रीरामपूर (अ.जा.) विधानसभा

मतदारसंघातील विशेष सखोल पुनरिक्षण अर्थात एस.आय. आर अंतर्गत पहिल्या टप्प्यातील मतदार पडताळणीचे काम पूर्ण झाले असून, काल (दि. ३१) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मतदारसंघात एस.आय. आर. पूर्वी एकूण ३,०५,४९७ मतदार होते. प्रारूप यादीत २,७४, ७२३ मतदार समाविष्ट असून ३०,७७४ मतदार वगळण्यात आले आहेत. यामध्ये मयत १०,२०८, अनुपस्थित ४,३८३, कायमस्वरूपी स्थलांतरित ११,९४७, दुबार ४,१७२ व इतर ६४ मतदारांचा समावेश आहे. सदर प्रारूप मतदार यादी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद श्रीरामपूर व देवळाली प्रवरा, सर्व तलाठी कार्यालये व सर्व मतदान केंद्रांवर बी.एल.ओ. यांच्याकडे निरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी नमुना ६ भरावा. तसेच नाव वगळणीसाठी नमुना ७ व दुरुस्तीसाठी नमुना ८ हा ३० सप्टेंबरपर्यंत भरता येईल. प्रारूप यादीतून चुकून नाव वगळलेल्या मतदारांनी नवीन नोंदणीसाठी नमुना ६ भरावा. याकामी काही अडचण अथवा शंका असल्यास निवडणूक शाखेत मतदार सहायता कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!