MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ : गुण फेरपडताळणीची संधी; उमेदवारांकडून फेरतपासणीची मागणी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या निकालानंतर गुणांमध्ये तफावत असल्याच्या तक्रारी आणि उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने गुण फेरपडताळणीची (Verification of Marks) संधी उपलब्ध करून दिली आहे.
इच्छुक उमेदवारांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून १० सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
मात्र, उमेदवारांकडून केवळ गुणांची बेरीज तपासण्याऐवजी उत्तरपत्रिकांची प्रत्यक्ष फेरतपासणी (Re-evaluation) करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यामुळे आयोगाच्या पुढील भूमिकेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 46






