नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १,८०० कोटींचा निधी मंजूर; विकासकामांना मिळणार गती


नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १,८०० कोटींचा निधी मंजूर; विकासकामांना मिळणार गती

नाशिक : २०२७ मध्ये होणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यासाठी राज्य सरकारने १,८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाने यासंदर्भात शासन निर्णय (GR) जारी केला आहे.

या निधीतून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा, स्वच्छता व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच भाविकांच्या निवासाची व्यवस्था यांसह विविध कामे करण्यात येणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या तात्पुरत्या सुविधांसोबतच काही कायमस्वरूपी विकासकामांनाही या निधीतून चालना मिळणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरातील पायाभूत सुविधांचा विस्तार होऊन शहराच्या दीर्घकालीन विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!