पाटणमध्ये बनावट शासकीय कागदपत्रे व शिक्के तयार केल्याचा आरोप; भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यावर गुन्हा
सातारा / पाटण : कर्ज प्रकरणासाठी बनावट शासकीय कागदपत्रे आणि शिक्के तयार करून त्यांचा वापर केल्याच्या आरोपावरून पाटण तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठोमसे ग्रामपंचायतीच्या तक्रारीनंतर मल्हारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कर्ज प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये बनावट शासकीय दस्तऐवज व शिक्क्यांचा वापर झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मल्हारपेठ पोलीस करत असून, तपासातून बनावट कागदपत्रे तयार करण्यामागील नेमकी पार्श्वभूमी आणि त्यांचा वापर कशासाठी करण्यात आला, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 29






