गणेशोत्सवात पुण्यात मद्यविक्रीवर निर्बंध; ‘या’ दिवशी शहरभर दुकाने बंद
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवर विविध निर्बंध लागू केले आहेत.
१४ सप्टेंबर – गणेश चतुर्थी : पुणे शहरात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार आहे.
२५ सप्टेंबर – अनंत चतुर्दशी : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरभर मद्यविक्री बंद ठेवण्यात येणार आहे.
२६ सप्टेंबर : विसर्जन मिरवणूक पूर्ण होईपर्यंत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाचा ५ वा व ७ वा दिवस : या दिवशी ठराविक गणेश विसर्जन मार्गांवरील मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
कायदा व सुव्यवस्था तसेच गणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संबंधित मद्यविक्रेत्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी






