जिल्हा सहकारी बँकेच्या प्रारुप मतदार यादीतील श्री, संत सावताचे संचालक विलास दाभाडे,नाव वगळले,विभागीय सहनिबंधकांचा आदेश,
टाकळीभान प्रतिनिधी – टाकळीभान येथील श्री संत सावता माळी सेवा सोसायटीचे संचालक विलास भाऊसाहेब दाभाडे यांचा जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या संचालक मंडळ निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीतून वगळण्याचा आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागिय सहनिबंधक, नाशिक यांनी दिले आहेत.
टाकळीभान सेवा सोसायटीचे सभासद अप्पासाहेब नानासाहेब रणनवरे यांनी याबाबत हरकत दाखल केली होती.
या बाबत दाखल केलेल्या हरकतीत रणनवरे यांनी म्हटले होते की, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६ ते २०२७ या कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठीची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झालेली आहे.
या प्रारुप मातदार यादीत श्री संत सावता माळी सेवा सोसायटीचे संचालक विलास भाऊसाहेब दाभाडे
यांचे नाव सामाविष्ट झालेले आहे. त्यांच्या आजी सुभद्राबाई दगडू नाईक यांच्या नावावर गट नं. ७६ मध्ये २ हेक्टर ८५ आर एवढी जमीन होती. सदर क्षेत्रावर टाकळीभान सोसायटीचे कर्ज थकीत असताना बेकायदेशिर हस्तांतर करुन विलास दाभाडे व कुटुंबाच्या नावावर केली आहे.आज रोजी या जमिनिवर संस्थेचे ८ लाख ८१ हजार मुद्दल व त्याचे होणारे व्याज ९ लाख ६९ हजार अशी एकूण १८ लाख ५० हजार थकबाकी आहे. त्यांनी ती बाकी न दर्शवता व न फेडता निवडणूक लढवून संचालकपद मिळवले आहे. त्यामुळे ते सदस्य म्हणून रहाण्यास व ठराव देण्यास आपात्र आहेत अशी हरकत घेतली होती. याबाबत सुनावणी घेण्यात आली होती. त्यात संबधीत संस्थेचे लेखी म्हणणे घेण्यात आले होते.
याबाबत विलास दाभाडे यांचेही म्हणणे घेण्यात आले होते. याबाबत सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांचाही आभिप्राय घेण्यात आला होता. याप्रकरणी दाभाडे यांचे म्हणणे, सहाय्यक निबंधक व जिल्हा उपनिबंधक यांचा आभिप्राय फेटाळण्यात आला विलास दाभाडे यांच्या आजीच्या नावे असलेली टाकळीभान सेवा संस्थेची थकबाकी अमान्य असल्याचा दाभाडे यांचा युक्तिवाद फेटाळून लावत विलास दाभाडे यांचे जिल्हा सह. बँकेच्या प्रारुप मतदार यादीतील नाव परीशिष्ट ‘अ’ नुसार वगळण्यात येत असल्याच आदेश विभागीय सह निबंधक संभाजी निकम यांनी दिला आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे,टाकळीभान ,श्रीरामपूर






