अकारी पडीत कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णयाचे सर्व श्रेय, अन् पुढील वाटप प्रक्रिया ना. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होणार- अँड अजित काळे.

टाकळीभन प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या हरिगांव मळा हद्दीतील ९ गांवे अकारी पडीत शेतकऱ्यांचे जमिनी परत करण्याचा निर्णय आज कॅबिनेट मध्ये झाला हे संपूर्ण श्रेय पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना देत असुन, पुढील वारसांच्या पाल्यास वाटपाची प्रक्रिया देखील ना.विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली होणार असल्याचे प्रतिपादन अकारी पडीत न्यायालयीन लढ्याचे मुख्य शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड अजित काळे यांनी ९ गावे अकारी पडीत शेतकऱ्यां समोर बोलताना केले.
आज मंगळवार राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीचा दिवस मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे आगेकुच धोरणामुळे कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक होते की नाही याबद्दल साशंकता होती.मात्र आज म़ंगळवार दि.१५ रोजी कॅबिनेट मंत्री मंडळ बैठक होईल अशी शक्यता नसताना बैठक पार पडली. कॅबिनेट बैठक पार पडताच बैठकित शेती महामंडळाच्या हरिगांव मळ्यातील ९ गावे अकारी पडीत शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याचा निर्णय पारित झाला.असल्याचा संदेश ९ गावांत सोशल मिडियावर
जलदगतीने पोहचताच गावोगावी हालचालींना वेग येऊन फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आणि अकारी पडीत संघटनेचे प्रमुख अँड अजित काळे यांना ९ गावातील शेतकऱ्यांनी श्रीरामपूर येथे येण्याची विनंती केली. कार्यकर्ते शेतकरी नाराज होऊ नये म्हणून आपण आज श्रीरामपूर येथे हजर झालो. कॅबिनेट मंत्री मंडळ बैठकित झालेल्या सर्व निर्णयाचे श्रेय आपण पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांना देत असून पुढील वाटप प्रक्रिया देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैणार असल्याचे ऊपस्थितीत वारसदार शेतकऱ्यांना ठणकावून सांगितले.
या कॅबिनेट मंत्री मंडळ बैठकिचा निर्णयानंतर ९ गावांत कोण कैच. फटाके वाजवून कुणाकुणाचे नावांच्या घोषणा देतात याकडे दुर्लक्ष करून संयम बाळगण्याचे आवाहन शेवटी अँड काळे यांनी केले.
या कांदा मार्केट जवळच्या अँड काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर छोटेखानी आनंदोत्सव सोहळ्यास ९ गावे अकारी पडीत गावातील सर्व प्रमुख वारसदार शेतकऱ्यासह शेतकरी संघटनेचे शेकडो शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर





