अध्यात्मिक धार्मिक कार्यातील व्यक्तींना प्रमाणपत्र साठी नाव नोंदणीचे आवाहन ..


अध्यात्मिक धार्मिक कार्यातील व्यक्तींना प्रमाणपत्र साठी नाव नोंदणीचे आवाहन

टाकळीभान: ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने यावर्षी सामाजिक उपक्रम व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सप्टेंबर सन- २०२६ या कार्यक्रमामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील गेल्या पंधरा वर्ष व त्यापेक्षा अधिक वर्षापासून अध्यात्मिक धार्मिक कार्य करणाऱ्या व आपली अध्यात्मिक धार्मिक संस्कृती, परंपरा जतन ठेवणाऱ्या हरिभक्त पारायण, कीर्तनकार ,प्रवचनकार, टाळकरी ,भजनी मंडळ, टाळ, मृदंग, पेटी वादक, तबलावादक , भजन गायक व विविध वाद्य वादक यांना ते करत असलेल्या अध्यात्मिक धार्मिक सेवेच्या कार्याबद्दल त्यांना विनामूल्य प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था , टाकळीभान या नोंदणीकृत संस्थेचे प्रमाणपत्र अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सेवार्थींना मिळाल्यास त्यांना शासनामार्फत मानधन मिळण्यासाठी, अर्ज करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो, या प्रमाणपत्राद्वारे ते कार्य करत असलेल्याचा अधिकृत दाखला/पुरावा त्यांना मिळणार आहे त्यामुळे या उदात्त हेतूतून संस्थेच्या वतीने अध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सेवार्थींना सदर विनामूल्य प्रमाणपत्र वाटपाचा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला असून श्रीरामपूर तालुक्यातील आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींनी आपली नाव नोंदणी दि. 20 सप्टेंबर पर्यंत श्री अर्जुन बी राऊत अध्यक्ष -ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था ,टाकळीभान, तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर मोबाईल/व्हाट्सअप नंबर संपर्क 8379810018,9881708445, उपाध्यक्ष संदीप पटारे 917083395055 यावर नोंदवावेत. नोंदणी झालेल्या सेवार्थींना या सप्टेंबर महिन्या मध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये सदर नाव नोंदणी केलेल्या सेवार्थींना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल. असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी:  दिलीप लोखंडे श्रीरामपूर


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!