मुंबईतील मेट्रो विस्ताराला गती; २०२७ ‘मेट्रो वर्ष’ करण्यावर भर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी ‘मुख्यमंत्री कार्यालय वॉर रूम’ची बैठक झाली.
मुंबईतील मेट्रो विस्तार, वाहतूक सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ म्हणून साजरे करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या आणि प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांचे नियोजन वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोसह विविध पायाभूत प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 36








