पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद संपगावकर यांची ब्राह्मण महासंघ कार्यालयास सदिच्छा भेट
पुणे : आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार श्री. मिलिंद संपगावकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज ब्राह्मण महासंघाच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच पदवीधर मतदारांच्या प्रश्नांवर संवाद साधण्यात आला.
ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी श्री. मिलिंद संपगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच आगामी वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पदवीधर मतदारसंघातील विविध प्रश्न, तरुणांचे प्रश्न, शिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबतही यावेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
या सदिच्छा भेटीदरम्यान ब्राह्मण महासंघ आणि हिंदू महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकारी उपस्थित होते. भेटीमुळे पदाधिकारी व उमेदवार यांच्यात सकारात्मक संवादाचे वातावरण निर्माण झाले.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी







