ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो मासे मृतावस्थेत; जलप्रदूषणाची शक्यता
मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावात शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माशांच्या मोठ्या प्रमाणातील मृत्यूमुळे तलावातील पाण्याची गुणवत्ता आणि संभाव्य जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली असून, तलावातील पाण्याची तातडीने तपासणी करून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, पितृपक्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पिंडदान विधींमुळे तलावातील प्रदूषण वाढले असावे, असा दावा काही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, माशांच्या मृत्यूमागील नेमके कारण अधिकृत पाणी तपासणी आणि संबंधित यंत्रणांच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 82







