पुण्यात पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती; अधिकृत पुष्टी प्रतीक्षेत
पुण्यात एका पोलिस उपनिरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकारी निलेश भाऊसाहेब पाटील असल्याचे सांगितले जात असून, त्यांची नेमणूक विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात असल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, औंध येथील नगरस रोडवरील त्यांच्या राहत्या घरी आज दुपारी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसल्याने अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
अधिकृत पुष्टी मिळाल्यानंतरच घटनेचे कारण आणि इतर तपशील स्पष्ट होतील.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 19





