नवघर, मुलुंड येथे भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट


नवघर, मुलुंड येथे भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट

मुंबई : मुलुंड येथील नवघर परिसरात धारावीमधून विस्थापित झालेल्या कुटुंबांच्या बांधकामाधीन PAP प्रकल्पासाठी उभारण्यात आलेल्या G+1 मजली कामगार वसाहतीला आज भीषण आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत ७ गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याची माहिती आहे. आग लागल्यानंतर परिसरातील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने, अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि वाहने घटनास्थळी दाखल झाली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आगीचे नेमके कारण तसेच नुकसानीचा तपशील अग्निशमन दलाच्या कारवाईनंतर स्पष्ट होणार आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!