पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट; १६ ऑक्टोबरपासून अतिरिक्त १० टक्के कपातीचे आदेश


पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचे संकट; १६ ऑक्टोबरपासून अतिरिक्त १० टक्के कपातीचे आदेश?

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. शहरात सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असताना १६ ऑक्टोबर २०२६ पासून अतिरिक्त १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे ६६५ दशलक्ष लिटर पाणी मिळते, तर शहराची गरज सुमारे ७७० दशलक्ष लिटर आहे. त्यामुळे पाणीपुरवठा आणि मागणी यामध्ये मोठी तफावत आहे.
पाणी कपात लागू झाल्यास शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक कठीण होऊ शकते. नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, पवना आणि आंद्रा धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती, पाणी कपातीचे नेमके कारण आणि या निर्णयाची कालमर्यादा याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!