आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये गॅस गळतीमुळे आग; दोन लहान मुलांसह पाच जण जखमी


आयआयटी बॉम्बे कॅम्पसमध्ये गॅस गळतीमुळे आग; दोन लहान मुलांसह पाच जण जखमी

मुंबई : मुंबईतील पवई येथील आयआयटी बॉम्बे (IIT Bombay) कॅम्पसमधील हॉस्टेल क्रमांक ६ येथे गॅस गळतीमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह पाच जण जखमी झाले आहेत.
घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
गॅस गळती नेमकी कशामुळे झाली आणि आगीचे कारण काय होते, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेमुळे आयआयटी परिसरात काही काळ खळबळ उडाली.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!