सोमठाण्यात जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड
बुलढाण्यात जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या
चिखली : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. दीपक सुरडकर याने जमिनीच्या वादातून स्वतःच्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची धारदार चाकूने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे सोमठाणा गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा आणि पुढील तपास सुरू असून, पसार झालेल्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.
जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 38




