मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान; लोकाभिमुख शासन आणि जलसंधारणातील योगदानाचा गौरव
वर्धा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डी.लिट. (D.Litt.) ही उपाधी प्रदान करण्यात आली. वर्धा येथे आयोजित ‘अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च’ या अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
लोकाभिमुख शासनव्यवस्था, संस्थात्मक विकास, पायाभूत सुविधांची उभारणी, आर्थिक उन्नती आणि समाजकल्याण या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. विशेषतः जलसंधारणाच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
या मानद पदवीमुळे सार्वजनिक प्रशासन, विकासाभिमुख धोरणे आणि समाजहिताच्या कार्यातील त्यांच्या योगदानाचा सन्मान अधोरेखित झाला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी








