‘स्मार्ट नागरिक’ शालेय अभ्यासक्रमाचे आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ पुस्तकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते ‘स्मार्ट नागरिक – नागरिकशास्त्र आणि संविधानिक मूल्ये’ या शालेय अभ्यासक्रमाचे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘विद्यार्थी प्रेरणा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये नागरिकशास्त्राची जाणीव, संविधानिक मूल्यांची समज आणि लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘स्मार्ट नागरिक’ हा अभ्यासक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. तर ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तकाच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य, विचार आणि सामाजिक योगदान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या प्रकाशन सोहळ्याला आमदार कालिदास कोळंबकर, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव रुजविण्यावर भर देण्यात आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी








