मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची चर्चा; पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत काही जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर परिसरात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, गोळीबार करणाऱ्या संशयितांचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. मात्र, गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच अभिनेता टायगर श्रॉफ याला प्रत्यक्ष लक्ष्य करण्यात आले होते का, याबाबतही अधिकृत पुष्टी मिळणे आवश्यक आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे
Views: 38






