सार्वजनिक कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरताय? गृह मंत्रालयाचा सायबर सुरक्षेबाबत इशारा!


सार्वजनिक कॉम्प्युटरवर WhatsApp Web वापरताय? गृह मंत्रालयाचा सायबर सुरक्षेबाबत इशारा!
केवळ ब्राउझर बंद करून उपयोग नाही; वापरानंतर खाते लॉगआउट करण्याचे आवाहन
नवी दिल्ली : कार्यालयातील किंवा सार्वजनिक कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (I4C) सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा इशारा दिला आहे.
अनेक जण कार्यालयातील किंवा इतरांसोबत शेअर केलेल्या कॉम्प्युटरवर WhatsApp Web सुरू करून काम झाल्यानंतर केवळ ब्राउझरची टॅब बंद करतात. मात्र, असे केल्याने व्हॉट्सॲप खाते लॉगआउट होत नाही. त्यामुळे संबंधित कॉम्प्युटरवर खाते सक्रिय राहण्याची शक्यता असते.
या माध्यमातून खासगी संदेश, फोटो आणि इतर महत्त्वाच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. तसेच सायबर फसवणुकीचाही धोका निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे सार्वजनिक किंवा सामायिक कॉम्प्युटरवर व्हॉट्सॲप वेब वापरल्यानंतर आवर्जून लॉगआउट करावे. शक्यतो अशा कॉम्प्युटरवर वैयक्तिक व्हॉट्सॲप खाते वापरणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी


84
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!