पिंपरीत ‘नोकरी मेळावा २०२६’; २४ नोव्हेंबरला थेट मुलाखतीची संधी!
फ्रेशर्ससह अनुभवी उमेदवारांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी; नोंदणी पूर्णपणे मोफत
पिंपरी : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसह अनुभवी उमेदवारांसाठी रोजगाराची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. पिंपरी लाईटहाऊस आणि लाईटहाऊस कम्युनिटीज यांच्या वतीने मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘नोकरी मेळावा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमध्ये थेट मुलाखती देण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.
हा मेळावा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारकाच्या दुसऱ्या मजल्यावर, हॉटेल हॉलिडे इनसमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील कंपन्या सहभागी होणार असून, फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, मेळाव्यासाठी नोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे.
इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना आपले अद्ययावत रेझ्युमेच्या चार प्रती सोबत आणाव्यात, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ८७८८०१२८६३ किंवा ८९५६८६८१६८ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








