भिवंडीत AK शोरमा स्टॉलमधील खाद्यपदार्थ खाल्ल्याने 56 जण आजारी; महापालिकेकडून दुकानावर तोडक कारवाई!
भिवंडी : भिवंडीमध्ये शोरमा खाल्ल्यानंतर तब्बल 56 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
भिवंडीतील AK शोरमा स्टॉलवरून शोरमा खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. प्रकृती बिघडल्याने बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची गंभीर दखल घेत भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेने संबंधित शोरमा स्टॉलवर तोडक कारवाई केली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचा आणि अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अधिक तपशील प्रतीक्षेत…
प्रतिनिधी सिंथिया कोरिया
Views: 73






