माहिममध्ये पी.सी. जैन ज्वेलर्सवर गोळीबार; हल्लेखोर घटनास्थळावरून फरार


माहिममध्ये पी.सी. जैन ज्वेलर्सवर गोळीबार; हल्लेखोर घटनास्थळावरून फरार


मुंबई : मुंबईतील माहिम परिसरात पी.सी. जैन ज्वेलर्स या सराफा दुकानावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, गोळीबार करणारे हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची पाहणी करून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी तसेच त्यांच्या शोधासाठी तपास सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. व्यापारी वर्गात या घटनेमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!