चर्मकार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा २९ नोव्हेंबरला सोलापुरात; समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन


चर्मकार समाजाचा वधू-वर परिचय मेळावा २९ नोव्हेंबरला सोलापुरात; समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन

सोलापूर : संत शिरोमणी रविदास विकास संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने तसेच संस्थेच्या संचालित रेशीम बंध वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून चर्मकार समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत लक्ष्मीतर गार्डन, पद्मावतीनगर, बाळे, सोलापूर-पुणे हायवे, सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. भारत वाघमारे (सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी, सोलापूर), श्री. राजनेश्वर जेऊरकर (मुख्य निमंत्रक, चर्मकार समाज विकास मंडळ, सोलापूर), श्री. तानाजी गवळी (पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर), सौ. श्रीदेवी जॉन फुलारे (नगरसेविका, सोलापूर महानगरपालिका) आणि सौ. संगीता शंकर जाधव (नगरसेविका, सोलापूर महानगरपालिका) उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याचे आयोजन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. सुखदेव नारायण सूर्यवंशी यांनी केले आहे.

चर्मकार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच समाजातील कुटुंबांना एकमेकांशी परिचित होण्याची संधी निर्माण करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.

समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रवेश शुल्क : ५०० रुपये

‘सामाजिक बांधिलकी व समाजसेवा हेच आमचे ध्येय’ या उद्देशाने संस्थेने हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.

प्रतिनिधी विजय अडसूळ


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!