भिवंडीत ड्रेनेज सफाईवेळी दुर्दैवी घटना; गुदमरून दोन कामगारांचा मृत्य


भिवंडीत ड्रेनेज सफाईवेळी दुर्दैवी घटना; गुदमरून दोन कामगारांचा मृत्य


भिवंडी : भिवंडी शहरात ड्रेनेज लाइनच्या सफाईचे काम सुरू असताना मॅनहोलमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ड्रेनेज सफाई कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील ड्रेनेज लाइनची सफाई करण्यासाठी कामगार मॅनहोलमध्ये उतरले होते. यावेळी आतमध्ये गुदमरल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
ड्रेनेज सफाईसारख्या धोकादायक कामांमध्ये आवश्यक सुरक्षा उपकरणे, ऑक्सिजनची व्यवस्था आणि सुरक्षेचे नियम पाळले जातात का, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!