बारामतीत थार गाडीने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात


बारामतीत थार गाडीने पोलीस कर्मचाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
बारामती : बारामती शहरात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर थार गाडी घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना थार गाडीच्या चालकाने त्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली.
या प्रकरणी संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. नेमका वाद कशामुळे झाला आणि आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांवरच अशा प्रकारचे हल्ले होण्याच्या घटना चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!