साताऱ्याच्या आकाशात भारतीय हवाई दलाचा थरार; ‘सूर्यकिरण एअर शो’ला नागरिकांची मोठी गर्दी


साताऱ्याच्या आकाशात भारतीय हवाई दलाचा थरार; ‘सूर्यकिरण एअर शो’ला नागरिकांची मोठी गर्दी
सातारा : भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे आणि कौशल्याचे दर्शन घडवणारा नेत्रदीपक ‘सूर्यकिरण एअर शो’ साताऱ्यात पार पडला. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक पथकाने आकाशात सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले.
या हवाई प्रात्यक्षिकांदरम्यान विमानांनी आकाशात विविध आकर्षक रचना साकारल्या. वेगवान हालचाली, अचूक समन्वय आणि एकमेकांच्या जवळून होणारी विमानांची उड्डाणे पाहून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाला लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. भारतीय हवाई दलाची व्यावसायिक क्षमता, शिस्त, धाडस आणि तांत्रिक कौशल्य यांचे दर्शन या एअर शोच्या माध्यमातून घडले.
साताऱ्याच्या आकाशात रंगलेल्या या थरारक प्रात्यक्षिकांची नागरिकांमध्ये विशेष चर्चा सुरू आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


85
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!