तामिळनाडू मंत्रिमंडळातील शिक्षणाचा ठसा; सर्वाधिक सुशिक्षित कॅबिनेटची चर्चा

प्रतिनिधी: तामिळनाडूमधील मंत्रिमंडळ देशातील सर्वाधिक सुशिक्षित कॅबिनेटपैकी एक असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार अनेक मंत्री उच्चशिक्षित असून विविध व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवही त्यांच्याकडे आहे.
उपलब्ध माहितीनुसार मंत्रिमंडळात ६ पीएचडी, २२ पदव्युत्तर, २५ पदवीधर, ५ आयआयटी अभियंते, ८ एमबीबीएस डॉक्टर, तसेच ४० वकील आणि अभियंते यांचा समावेश आहे. याशिवाय १२ बारावी उत्तीर्ण आणि ८ दहावी उत्तीर्ण सदस्यही आहेत.
उच्चशिक्षित आणि विविध क्षेत्रातील अनुभव असलेल्या सदस्यांमुळे प्रशासन, धोरणनिर्मिती आणि लोकाभिमुख निर्णय प्रक्रियेला बळ मिळत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे तामिळनाडूचे हे मंत्रिमंडळ देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.









