लोहारा तालुका ब्राह्मण महासंघाच्या कार्यकारिणीची निवड; देवा भाऊ महाजन यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
लोहारा: ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शशीकर आणि संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुका कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीत श्री देवा भाऊ महाजन यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी संघटनेतील विविध पदांचीही घोषणा करण्यात आली. कार्याध्यक्षपदी श्री विलास जेवळीकर, तर तालुका सचिवपदी श्री गणेश हिप्परगेकर यांची निवड करण्यात आली. प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण शशीकर यांच्या सूचनेनुसार नव्याने स्थापन झालेली ही कार्यकारिणी तालुक्यात संघटन विस्तार आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना चालना देणार असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमाला ब्राह्मण महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवराज भैय्या आचार्य, धाराशिव शहराध्यक्ष विंध्य कुलकर्णी, प्रवीण कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, देवदत्त महाजन, रविकाका कुलकर्णी, गोपाळ संधिंकर, जनक कुलकर्णी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात आले. आगामी काळात संघटना अधिक सक्षम करून समाजहितासाठी प्रभावीपणे कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
पत्रकार – उमेश कुलकर्णी
मो. 9822548429








