बारामतीत शिकाऊ विमान कोसळलं

Baramati : बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. रेडबर्ड कंपनीचे शिकाऊ विमान गोजुबावी गावाच्या हद्दीत कोसळल्याची घटना घडली आहे. घटना घडताच पोलीस आणि प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, हे विमान प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. मात्र विमान नेमकं कशामुळे कोसळलं याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
विशेष म्हणजे, याच गोजुबावी गावाजवळ यापूर्वी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या विमानालाही अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या परिसरातील विमान दुर्घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून अधिक तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे
Views: 25









