मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय; २०२९ पर्यंत नवीन प्रकल्पांना ब्रेक, सुरू कामे पूर्ण करण्यावर भर


मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय; २०२९ पर्यंत नवीन प्रकल्पांना ब्रेक, सुरू कामे पूर्ण करण्यावर भर

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेकडून आगामी काही वर्षांसाठी विकास धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, २०२९ पर्यंत कोणतेही नवीन प्रकल्प हाती न घेता सध्या सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर प्रशासनाचा मुख्य भर राहणार आहे.
महापालिकेच्या विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि इतर विकासकामांची पूर्तता करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे. वाढता आर्थिक ताण, प्रलंबित कामांचा बोजा आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी यामुळे हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
यामुळे नवीन विकासकामांच्या प्रस्तावांना काही काळासाठी ब्रेक लागू शकतो, तर सुरू असलेल्या प्रकल्पांच्या गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ततेवर प्रशासनाचा फोकस राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या संदर्भातील अधिकृत घोषणा किंवा अंतिम धोरण समोर येणे बाकी असून, नागरिकांचे लक्ष आता महापालिकेच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!