प्रवेशाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; पुण्यातील दोन बोगस कॉल सेंटरवर कारवाई
पुणे : नामांकित शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील विमाननगर आणि खराडी परिसरातील दोन बोगस कॉल सेंटरवर छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या कारवाईत १० आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून सुमारे १ कोटी ३५ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच २४ लाख रुपये गोठवण्यात आल्याची माहिती आहे.
एका महिलेची १६.५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातून या कथित आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 38







