भारताला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’; १०.०९ सेकंदात १०० मीटर पार करत गुरिंदरवीर सिंह बनला सर्वात वेगवान धावपटू
भारताच्या अॅथलेटिक्स क्षेत्रात सध्या एकाच नावाचा बोलबाला आहे, ते म्हणजे गुरिंदरवीर सिंह. पंजाबमधील जालंधरच्या या २५ वर्षीय धावपटूने १०० मीटर शर्यत अवघ्या १०.०९ सेकंदात पूर्ण करून भारताचा सर्वात वेगवान धावपटू होण्याचा ऐतिहासिक मान मिळवला आहे.
लहानपणापासूनच खेळाची आवड
सहावी इयत्तेत असल्यापासून गुरिंदरवीरने अॅथलेटिक्सला सुरुवात केली होती. खेळाचे बाळकडू त्याला घरातूनच मिळाले आहे; त्याचे वडील कमलजीत सिंह हे पोलीस दलात कार्यरत असून ते स्वतः माजी व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. गुरिंदरवीरने यापूर्वी युथ एशिया आणि ज्युनियर एशियासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली आहे.
पुढील ध्येय १० सेकंदांच्या आत
गुरिंदरवीरने आपल्या यशाचे प्रदर्शन करताना एका फलकाद्वारे “Task is not finished yet” असा संदेश दिला आहे. १०.०९ सेकंदांची नोंद केल्यानंतर आता त्याचे पुढील लक्ष्य १० सेकंदांच्या आत अंतर पार करण्याचे आहे. त्याच्या या कामगिरीमुळे आगामी जागतिक स्पर्धांमध्ये भारताच्या आशा उंचावल्या आहेत.
पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429







