महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; राज्यातील ५ खासदारांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. संसदेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिला जाणारा मानाचा ‘संसद रत्न’ पुरस्कार राज्यातील ५ खासदारांना जाहीर झाला आहे. यामध्ये ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा समावेश असून, त्यांना सलग दुसऱ्यांदा या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
या दोघांशिवाय महाराष्ट्रातील डॉ. हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि डॉ. मेधा कुलकर्णी यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या निवडीमुळे राज्यभरातून या खासदारांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 85







