कोडोलीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त; शाहूवाडीतील एकाला अटक:-


कोडोलीत बेकायदेशीर विदेशी दारू साठा जप्त; शाहूवाडीतील एकाला अटक:-

जि. कोल्हापूर, ता.कोडोली:दि. 23 जून :-पन्हाळा तालुक्यातील कोडोली-बोरपाडळे मार्गावरील नृसिंह ओढ्याजवळ कोडोली पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणारी कार पकडली. या कारवाईत तब्बल ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शाहूवाडी तालुक्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोडोली पोलिसांना बेकायदेशीर विदेशी दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नृसिंह ओढ्याजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली.

यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या येताना दिसून आली. पोलिसांनी वाहन अडवून झडती घेतली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.

या कारवाईत विदेशी दारूचा साठा तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार असा एकूण ३ लाख ६५ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक संतोष दिनकर पाटील (वय ३९, रा. कोळगाव, ता. शाहूवाडी) याला जागीच अटक केली. त्याच्याविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात बेकायदेशीर दारू वाहतूक आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कोडोली पोलीस पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात झाल्याचे बोलले जात आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!