​पुणे मेट्रोच्या कोचमध्ये साचले पाणी; व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने दिले ‘हे’ तांत्रिक स्पष्टीकरण


​​पुणे मेट्रोच्या कोचमध्ये साचले पाणी; व्हिडिओ व्हायरल होताच प्रशासनाने दिले ‘हे’ तांत्रिक स्पष्टीकरण

पुणे मेट्रोच्या कोचमध्ये पाणी साचल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते, ज्याची दखल घेत आता मेट्रो प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे.

२१ मे २०२६ रोजी रामवाडी स्टेशनवरील ट्रेनमध्ये ही घटना घडली होती. सुरुवातीला हे पावसाचे पाणी असल्याचे बोलले जात होते. मात्र, जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर तांबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पावसाचे पाणी नसून एसी (HVAC) यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे झालेली गळती होती. धुळीमुळे ‘HVAC’ चा ड्रेन पाईप चोक झाल्याने एसीचे पाणी कोचमध्ये साचले होते.
​तात्काळ दुरुस्तीचे आश्वासन
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हा तांत्रिक बिघाड लक्षात येताच तो तात्काळ दुरुस्त करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी मेट्रो प्रशासन कटीबद्ध असल्याचेही तांबेकर यांनी यावेळी नमूद केले.

​पत्रकार उमेश कुलकर्णी 9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!